पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'हे' ट्विट बनले 'गोल्डन ट्विट'

10 Dec 2019 12:02:18
Narendra Modi tweeter _1&


नवी दिल्ली : ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा या वर्षीही कायम राहिला. २०१९ हे लोकसभा इलेक्शन २०१९या हॅशटॅगने गाजले, सर्वाधिक लोक्रप्रिय दहा व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

 

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले सबका साथ+सबका विकास+सबका विश्वास = विजयी भारत या आशयाचे ट्विट केले आहे. हे ट्विट 'गोल्डन ट्विट' ठरले आहे. या ट्वीटला एक लाख १७ हजार १०० रिट्विट, तर तब्बल चार लाख २० हजार लाईक्स मिळाले आहेत.

 

'क्रीडा' विभागात विराट कोहली याने महेंद्र सिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ट्ट्विट सर्वाधिक झाले, तर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा टॉलिवूडने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. विजय या अभिनेत्यानं बिगिलया चित्रपटाबाबत कलेले ट्वीट सर्वाधिक रीट्वीट झाले.


सविस्तर ट्विटर ब़्लॉग

 

विराट कोहलीच्या टि्वटला ४५ हजार १०० रीटि्वट आणि चार लाख १२ हजार लाइक्स मिळाले. लोकसभा निवडणूकआणि चांद्रयान २सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले, तर पुलवामा’, ‘आर्टीकल ३७०हे विषयही ट्रेंडिंग राहिले.

Powered By Sangraha 9.0