'या' ठरल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

    दिनांक  10-Dec-2019 11:48:53
|


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : फिनलँडच्या वाहतुक मंत्री आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या ३४ वर्षीय सना मरीन रविवारी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्या मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. जगाच्या इतिहासात सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान सना मरीन यांनी मिळवला आहे. मंगळवारी त्यांच्या पार्टीच्या एंटी रिने यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. देशात मागील एका महिन्यांपासून पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांचे आदोंलन सुरू होते, त्यातून तोडगा काढण्यात रिने यांना अपयश आल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

 

सना मरीन यांनी टॅम्परे विश्वविद्यालयतून प्रशासकीय विज्ञानाची पदव्युत्तर डिग्री मिळवली. त्या अवघ्या २७ व्या वर्षीय टॅम्परेच्या नगर परिषदप्रमुके म्हणून निवडून आल्या. त्यानंतर जून २०१९मध्ये वाहतूक आणि दूरसंचार मंत्रीपदावर त्यांची निवड झाली. जगात दुसरे सर्वात तरुण पंतप्रधान यूक्रेनचे ओलेक्सी होन्चेरुक आहेत. ते फक्त ३५ वर्षांचे आहेत. मरीन यांना काही पत्रकारांनी त्यांच्या वयावरुन प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "मी कधीच वय आणि लिंगाचा विचार केला नाही. मी काही करण्यासाठी राजकारणात आले आणि लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला."