राज्यात सरकार स्थापन झाल्यावर १० दिवसांत नऊ गंभीर गुन्हे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |

UT _1  H x W: 0



मुंबई : राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात १० दिवसांत नऊ गंभीर स्वरुपातील गुन्हे दाखल झाल्याची तक्रार आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा गुन्हेगार तर घेत नाहीत ना? पोलीस यंत्रणेचे या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष झालेले नाही ना ?, असा प्रश्न शेलार यांनी पत्राद्वारे नव्या सरकारला केला आहे.

 

नव्या सरकारचे खातेवाटप अद्याप खोळंबले आहे. तिन्ही पक्षांचे किमान समान कार्यक्रमात ठरलेल्या सुत्रांवर अद्याप काहीही निर्णय निघत नसल्याने दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावरच आता खातेवाटप केले जाणार असल्याची परिस्थिती सध्या आहे. यावरून आमदार आशिष शेलार यांनी सरकारला जाब विचारला आहे. राज्यातील नऊ गुन्ह्यांची सविस्तर माहिती त्यांनी राज्य सरकारला पाठवली आहे.



 



महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाईचे आदेश

दरम्यान, राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.



 


१० दिवसांत नऊ गंभीर गुन्हे

· हैदराबाद येथील तरुणीवर अत्याचाराचा अमानुष प्रकार घडल्यानंतर काही दिवसांतच नागपूर नजीकच्या कळमेश्वरमध्ये येथे जिल्हा परिषद शाळेच्या बालवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षीय मलीवर अत्याचार आणि हत्या केल्याची माणुसकीला काळीमा फसणारी घटना दि.१ डिसेंबर रोजी घडली.

· ठाणे शहरातील वागळे इस्टेट, नेहरू नगर भागातून १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली याच आठवड्यात अशा याच भागात एकूण ४ घटना घडल्या असून वागळे इस्टेट इंदिरा नगर येथील १६ वर्षीय मुलगी कळवा येथील भीमनगर भागातील १४ वर्षीय मुलीचे ४ डिसेंबर रोजी अपहरण तर भोलाई नगर मधील १८ वर्षीय मुलीचे ६ डिसेंबर रोजी अपहरण झाले. याच दहा दिवसांच्या काळात एकट्या ठाणे शहरामध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या अशा चार घटना घडल्या.

 

· कल्याण स्थानकाबाहेर एका बॅगत एका महिलेचा मृतदेह आढळून आला, यात बापानेच २२ वर्षीय मुलीचा खून केल्याची ही घटना रविवार दि. १ डिसेंबर रोजी टिटवाळा येथे घडली.

 

· १ डिसेंबर रोजी चेंबूर येथे दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एका भावाची हत्या झाल्याचा प्रकार घडला.

 

· विरारमध्ये पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली. मानवेलपाडा येथे ९ डिसेंबरला घडली.

 

· वाकोला येथील मुलीने बापाची हत्या केल्याची घटना दि. ७ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती.

 

· मद्यधुंद चालकाने अर्चना पारटे या १९ वर्षीय मुलीला भरधाव गाडीखाली चिरडल्याची घटना चुनाभट्टी येथे दि. ७ डिसेंबर रोजी घडली असून मुंबईतील हिट ॲण्ड रन पुन्हा चर्चेत आले आहे.

 

· जळगाव जमूद खेर्डा येथे अविवाहित दिव्यांग मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली. अशा सतत घडणाऱ्या घटनांमुळे मुली आणि महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

· तर दि. ८ डिसेंबर रोजी पोलीस कारवाईत तब्बल ५ कोटी ६० लाख चा एमडीचा साठा जप्त झालाअसून ड्रग्स माफियांनी ही डोके वर काढल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.






'
सामना'तील बातम्यांचाही उल्लेख

शेलार यांनी आपल्या पत्रात 'सामना' वृत्तपत्रातील बातम्यांचा उल्लेखही केला आहे. ते म्हणाले, "दि. १० डिसेंबर रोजी 'सामना' या दैनिकातच अशा गुन्हेगारी स्वरूपातील ४ ते ५ बातम्या प्रकाशित झाल्या. खून, चोऱ्या, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर स्वरूपातील या घटनांमुळे भीतीचे वातावरण जनतेमध्ये आहे. तरी आपण या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन जनतेमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी करण्याच्या दृष्टीने आणि त्याबाबत उपयोजना करण्याबाबत तातडीच्या सूचना संबंधितांना द्याव्यात ही विनंती."

@@AUTHORINFO_V1@@