बेस्टला आणखी ४०० कोटींचा मदतीचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


मुंबई : महापालिकेने बेस्ट उपक्रमाला ४०० कोटी रुपयांची मदत देण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. महापालिकेकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत १७०० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला होता. बेस्ट उपक्रमावर २५०० कोटींचे कर्ज असल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देणेही अवघड झाले होते. अशा परिस्थितीत महापालिकेने बेस्टला चार वर्षांपासून आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे.

 

महापालिकेने बेस्टला या वर्षी २१०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील १७०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले असून, ४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सप्टेंबरमध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर या प्रस्तावाला सोमवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@