जमत नसेल तर राजीनामे द्या : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |


ajit pawar_1  H


बारामती
: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आक्रमक आणि लहरी स्वभाव महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या काळात संपूर्ण देशाने पहिला. त्यांच्या याच आक्रमक व तडकाफडकी निर्णय घेण्याच्या स्वभावाची अनुभूती पुन्हा एकदा बारामती नगरपालिकेच्या बैठकीत पाहायला मिळाली.

 


बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांची सर्वसाधारण बैठक शासकीय विश्रामगृहात बोलविण्यात आली होती. या बैठकीत नगरसेवकांनी एकमेकांवर तक्रारी करायला सुरुवात केल्याने अजित पवार यांनी सर्वच नगरसेवकांना खडे बोल सुनावले. काही वेळ तर राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांच्या शाब्दिक चकमकीत अजित पवारांना मध्यस्थी करावी लागली. तरीही हि वादावादी थांबत नसल्याचे चित्र पाहता अजित पवारांनी आक्रमक पवित्र घेत
, तुमच्यातील वाद सुटत नसतील तर सर्वानी राजीनामे द्या अशा शब्दांत सर्वांना सुनावले. तसेच ते पुढे म्हणाले कि, "प्रशासक बसवून त्यांच्याकडून मी कामे करवून घेतो. सत्ता आल्यांनतर विकासकामे करायची कि तुमच्यातले वाद मिटवायचे. त्यामुळे जमतं नसेल तर राजीनामे द्या." असा स्पष्ट शब्दांत त्यांनी सर्व नगरसेवकांना खडे बोल सुनावले.
@@AUTHORINFO_V1@@