पुण्यात कार अपघातात एक ठार

    दिनांक  10-Dec-2019 13:29:03
|

Pune  _1  H x W

 


मुंबई : पुणे द्रुतगतिमार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून जोरात धडक दिली.

घटनेत महेश कदम यांचा मृत्यू झाला, तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, या दोन्ही जखमीना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच महामार्ग पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.