विधानसभेत पुन्हा गाजले 'मी पुन्हा येईल'

01 Dec 2019 18:43:28




मुंबई
: आज विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. अभिनंदनीय भाषणांना उत्तर देताना आणि विरोधी पक्षनेते म्हणून यावेळचे पहिले भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या त्या वाक्याचे समर्थन केले. ते म्हणाले, ”हे खरं आहे की मी म्हटलं होतं, मी पुन्हा येईन. मी कुठे नाही म्हटलं. अशा गोष्टी लोकशाहीमध्ये होत असतात. महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. १०५ आमदार निवडून दिले आहेत. जनतेचीच इच्छा होती. जनादेश तोच होता. जनादेशाचा सन्मान आम्ही ठेऊ शकलो नाहीत. ही गोष्ट वेगळी आहे. मी आता अशी त्यात सुधारणा करतो की मी, तेव्हा वेळ सांगितला नव्हता. मी पुन्हा येईन, म्हणालो होतो. त्यामुळे वाट बघा.






पुढे शेर सादर करत पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले व आपल्या वाक्याचे समर्थन केले.

"मेरा पानी उतरता देख

किनारे पर घर मत बना लेना

मैं समंदर हूं

लौटकर जरूर आऊंगा


या ओळींनंतर भाजपाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अभिनंदनीय भाषण संपवताना फडणवीस म्हणाले की
, ”भुजबळ साहेब इतकं घाबरू नका. पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो. आता राजकारणात काहीही अशक्य राहिलेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आलात, त्यानंतर अशक्य असं काहीही राहिलेलं नाही.जनतेच्या मदतीसाठी कधीही धावून यायला आम्ही तयार आहोत.असे महान त्यांनी आपले भाषण संपविले.

Powered By Sangraha 9.0