आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची संधी द्या - शरद पवार

    दिनांक  06-Nov-2019 13:23:07
|
मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्राने 'शिवसेना-भाजप' महायुतीला कौल दिला असल्याने त्यांनी सरकार तयार करुन 'काॅंग्रेस-राष्ट्रवादी' आघाडीला विरोधी पक्षात बसण्याची संधी द्यावी, असे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले. शिवाय मला मुख्यमंत्री पदामध्ये कोणताही रस नसून राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भिती केवळ शिवसेनेला असल्याचा टोला त्यांनी लगावला.

 

महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने त्यांनीच सरकार स्थापन करावे, असे मत राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. या सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याची स्षटोक्तीही त्यांनी दिली. दरम्यान सकाळी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी शिवसेनाच राष्ट्रपती राजवटीची भिती असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री पदी बसण्याची आशा मला नसल्याचे त्यांनी स्षष्ट केले.