'पानिपत' चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक  05-Nov-2019 12:45:23
|


१७६१ साली पानिपत अस्तित्वात आले. याच पानिपतमध्ये झालेल्या मराठा आणि अहमद शहा अब्दाली झालेल्या लढाईवर आधारित 'पानिपत' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी आज त्याचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट करण्याचा हातखंडा असल्यामुळे त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र आता हा ट्रेलर पाहिल्यावर त्या आणखी उंचावतील.

दरम्यान कालच या चित्रपटातील काही मुख्य भूमिकांची पहिली वाहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त, मराठा सैन्याचे सर-सेनापती सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वती बाई यांची भूमिका साकारणारी क्रिती सेनन या काही महत्वाच्या भूमिकांचे फर्स्ट लुक काल प्रदर्शित झाले.

आशुतोष गोवारीकरच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. शिवाय संजय दत्त अग्निपथ नंतर पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय त्याचेही आकर्षण प्रेक्षकांना असेल. येत्या ६ डिसेम्बरला 'पानिपत' च्या युद्धाचा तो थरार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.