सर कभी झुकने न देंगे ! जम्मू काश्मीरचा नवा नकाशा जाहीर

    दिनांक  05-Nov-2019 14:58:40
|
 


जम्मू : ३१ ऑक्टोबर रोजी नव्याने स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचे राजकीय नकाशे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. नव्या नकाशामध्ये लडाख आणि जम्मू काश्मीरसह पहिल्यांदाच पाकव्याप्त काश्मीर, मीरपूर, मुझफ्फराबाद, पाकव्याप्त लडाखचे गिलगिट-बलिस्तान आणि चीनने घुसखोरी करत मिळवलेला लडाखचा भूभागही भारतातच दाखवण्यात आला आहे. लडाख आणि जम्मू काश्मीरला वेगळ्या रंगाने दर्शवत अधिकृत मानकचित्र प्रसारित करण्यात आले आहेत. 

सर्व्हेअर ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आलेला जुना आणि नवा नकाशा पाहिला असता हा फरक लक्षात येईल. यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर, मीरपूर, मुझफ्फराबाद, पाकव्याप्त लडाखचे गिलगिट-बलिस्तान आणि चीनने घुसखोरी करत मिळवलेला लडाखचा भूभाग हा रिक्त म्हणजेच शुभ्र रंगात दर्शवला जायचा. जम्मू काश्मीरच्या राजकीय मानचित्रात सहभागी केला जात नसे. नव्याने जाहीर करण्यात आलेला नकाशामुळे आता अधिकृतरित्या सहभागी केला जाऊ शकतो.

 

यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर, लडाख, गिलगिटस्तान-बलिस्तान आणि चीनने काबीज केलेला लडाख आदी भागात किती जिल्हे आहेत. याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नव्हते. यापूर्वी पाकव्याप्त गिलगिट-बलिस्तान काश्मीरचा हिस्सा मानला जात असे मात्र, आता तो लेहचा हिस्सा बनला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये येणाऱ्या मीरापूर मुजफ्फराबाद या क्षेत्रालाही भारताने संघ राज्य जम्मू काश्मीरमध्ये सामाविष्ट केले आहे. भारत सरकारने या राज्यांची प्रादेशिक स्तरावर जिल्ह्यांची सीमाही स्पष्ट केली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर-मुझफ्फराबाद हा हिस्सा काश्मीर घाटीचा हिस्सा न दर्शवता जम्मू काश्मीरचा दर्शवण्यात आला आहे.

 

 

काश्मीर घाटीमध्ये फोफावणारा दहशतवाद आणि फुटीरतावादाला जगासमोर आणताना संपूर्ण काश्मीरला जबाबदार धरले जात असे. काश्मीर घाटी जिथे केवळ पाच जिल्ह्यांचा सामावेश आहे. त्याचे क्षेत्रफळ हे केवळ ७ हजार वर्ग किमी इतके आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरचे क्षेत्रफळ हे २ लाख २२ हजार २३६ वर्ग किमी इतके आहे. या तीन टक्के भूभागात फोफावलेला फुटीरतावादामुळे संपूर्ण लडाख आणि जम्मू काश्मीरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असे, जम्मू काश्मीर आणि लडाखला संबोधित करतानाही काश्मीर असेच संबोधले जात असे, त्यामुळे नव्या नकाशा आणि मानकचित्रामुळे आता चित्र बदलण्याची आशा इथल्या नागरिकांना आहे.