‘मानवी मूल्यांसोबत वैज्ञानिक मूल्येही महत्वाची' - पंतप्रधान मोदी

    दिनांक  05-Nov-2019 19:29:46
|
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोलकाता येथे आजपासून सुरु होत असलेल्या 'आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवा'चे उदघाटन केले. यावेळी संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की,"जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत नाही असा कोणताही देश नाही."

 

पीएम मोदी म्हणाले, "भारताने संपूर्ण जगाला अनेक महान वैज्ञानिक दिले आहेत. असे दिसते आहे की विज्ञानाबद्दल आपल्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये रुचीची एक नवीन लाट निर्माण झाली आहे. २१व्या शतकातील वैज्ञानिक वातावरणात ही उर्जा योग्य दिशेने नेण्यासाठी, योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देणे ही आपली जबाबदारी आहे.

 

पुढे मोदी म्हणतात, "देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान इकोसिस्टम खूप मजबूत असले पाहिजे. आम्ही या दिशेने वाटचाल करीत आहोत." यंदाच्या वर्षीच्या थीमचे कौतुक करताना मोदी म्हणतात," या महोत्सवाची थीम ठरविल्याबद्दल आयोजकांचे अनेक अभिनंदन. RISEN: Research, Innovation and Science Empowering the Nation'ही थीम २१ व्या शतकाच्या भारताच्या अनुषंगाने आहे आणि यातच आपल्या भविष्याचे सार आहे.