काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

    दिनांक  04-Nov-2019 15:45:54
|


 श्रीनगर : मौलाना आजाद रोडवर सोमवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेडने हल्ला केला आहे. सर्वात जास्त रहदारी असलेल्या या परिसरात केलेल्या हल्यात एकूण १५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा ग्रेनेड करण्याचा डाव काहीसा फसला. फेकलेला ग्रेनेड रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. मात्र, या हल्ल्यात एकूण १५ जण जखमी झाले.


पोलिसांनी लष्कराच्या मदतीने या भागात तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो श्रीनगरच्या हरी सिंह स्ट्रीट गर्दी असलेला परिसर आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाने 'जैश-ए-मोहम्मद'चे तीन दहशतवादी मारले होते. लष्कराला हे दहशतवादी लपले सल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर जवान तेथे गेले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यांना उत्तर देताना भारतीय जवानांनी फायरिंग केली आणि तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. दरम्यान, या प्रकारानंतरही घटनास्थळावर दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.