केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचे आश्वासन

    दिनांक  04-Nov-2019 15:35:16
|


राज्याला लवकरात लवकर नवे सरकार प्राप्त होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. सत्तेच्या समीकरणात कोण काय म्हणत आहे यावर आपण काहीही बोलणार नाही, असे नमूद करताना त्यांनी या संदर्भात अधिक बोलणे टाळले. राज्याला नव्या सरकारची आवश्यकता असून ती लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याकरता केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी या भेटीदरम्यान आपण गृहमंत्र्यांकडे केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सांगितले. गृहमंत्र्यांनी यावर मदतीचे आश्र्वासन दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान सत्तास्थापन कोण करणार याविषयी राज्यात चर्चेला उधाण आले असताना सत्तेचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज झालेल्या बैठकीचे निष्पन्न काय होते हे पाहणे आता खूपच महत्वाचे ठरेल.