
मुंबई : ' हे सभागृह सगळे नियम धान्यावर बसवून ,नियमबाह्य पद्धतीने सभागृहाचं कामकाज सुरु आहे. तसेच आजपर्यंतच्या इतिहासात कधीही अधिवेशन काळात हंगामी अध्यक्ष बदलण्यात आलेले नाही. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला नाही. हि विधानसभेची परंपरा आहे. तुमच्याकडे बहुमत होता तर मग आधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक का घेतली नाही." असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित करत भाजपने सभात्याग केला.
Interaction with media ( Deferred Live) https://t.co/4eiL08UARR
‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजपा आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. रात्री अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला असा, आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.