गोव्याच्या मोहिमेवर निघालेल्या संजय राऊतांचे स्वप्न भंगले

    दिनांक  30-Nov-2019 12:27:49
|

 मुंबई
: काल पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपण आता महाराष्ट्रानंतर गोव्यात राजकीय भूकंप घडवणार असल्याचे सांगितले. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. परंतु या गोवा मोहिमेवर निघालेल्या संजय राऊतांना गोवा काँग्रेसने मोठा झटका दिला.एका वृत्तपत्राला माहिती देताना आपण गोव्यात विरोधी पक्षातच बसणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून गोवा सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील नसल्याचेही सांगितले. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडकर म्हणले
,"घोडेबाजार करून सत्तेत बसण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावरच बसू. गोव्यात ४० पैकी ३० आमदार हे भाजपच्याबाजूने आहेत. त्यामुळे सरकार पडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावरच बसने पसंत करू." काँग्रेसच्या या निर्णयामुळे गोव्यातील सत्ता उलथवण्याचे संजय राऊत यांचे स्वप्न भंगले असल्याचे स्पष्ट होते.संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते विनय तेंडुलकर म्हणाले
,  "महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा." २०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला १३ जागांवर विजय मिळवू शकला होता. पण भाजपाने इतर पक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली होती. भाजपाला गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिला होता.