हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही; सलमान खानला नोटीस

    दिनांक  29-Nov-2019 13:00:50
|काही दिवसांपुर्वीच सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'दबंग-३' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्यावर होणाऱ्या टीकेमुळे, ‘हुड हुड दबंगहे गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यातून हिंदू साधू-संतांचा अपमान केल्याची टीका करण्यात येत आहे.

अभिनेता सलमान खान सोबत या गाण्यामध्ये नृत्य करणाऱ्या कलाकारांनी नागा साधूंची वेशभूषा केल्यामुळेच हे गाणे वादात सापडले आहे. साधू-संतांना नाचताना दाखवल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोक नाराज झाले आहेत. ट्विटरवर #BoycottDabangg3 अशा हॅशटॅगच्या माध्यमातून लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.


हिंदू संतांचा असा अपमान सहन केला जाणार नाही. हिंदू धर्मालाच बॉलिवूड हे कायम लक्ष्य करत आले आहे, अशी टीकादेखील पीकेआणि ओ माय गॉडया चित्रपटांचे उदाहरण देत केली जात आहे. तर, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.