नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. परंतु तीन वेगवेगळ्या विचारधारेवर काम करणारे हे पक्ष आता किती काळ एकत्र युती टिकवतील याबाबत साशंकता येते. यात मात्र सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेल्या शिवसेना पक्षावर चौफेर टीका होताना दिसून येते. केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी शिवसेनेने बाळासाहेबांचा आत्मा (हिंदुत्व) सोनिया गांधींकडे गहाण ठेवला अशा शब्दांत टीका केली. तर 'शिवसेनेला आता रामनामासाठी देखील १० जनपथवर नाक घासावे लागणार आहे' असे देखील म्हणले आहे.