लैंगिक शोषणाच्या दृश्यामुळे हा चित्रपट वादात

    दिनांक  29-Nov-2019 14:31:39
|गुरुवारी हैद्राबादमध्ये झालेल्या महिला डॉक्टर हत्याप्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, बॉलिवूड चित्रपटात शाळकरी मुलीचे शोषण होताना दाखवल्यामुळे 'कमांडो ३' या चित्रपटावर टीकेची मोठी झोड उठत आहे.

विद्युत् जामवालचा
'कमांडो ३' शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रमोशनच्या हेतूने अभिनेत्याचे एंट्रीचे दृश्य यूट्यूबवर शेअर करण्यात आले होते. या दृश्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पाच मिनिटांच्या या दृश्यात एक पहिलवान शाळेकरी मुलीचा स्कर्ट ओढताना दाखवला आहे. एक पहिलवान लहान शाळकरी मुलीचे शोषण करताना दाखवल्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हे दृश्य दाखवल्यामुळे सोशल मीडियावरून या चित्रपटावर टीका केली जात आहे.एकीकडे जिथे शाळेच्या मुलीचे लैंगिक शोषण दाखवल्यामुळे लोक संतप्त आहेत, तर दुसरीकडे पहिलवानांची प्रतिमा खराब केल्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे.