'बघूया, तीनचाकी सरकार किती काळ चालते ?' : पूनम महाजन

    दिनांक  29-Nov-2019 00:00:39
|


शिवसेना कदाचित नैसर्गिक विचारधारेकडे परत येईल असा आशावादही पूनम महाजन यांनी व्यक्त केला आहे


वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाच्या खासदार  आणि युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचे   अभिनंदन केले आहे. मात्र हे महाविकासआघाडीचे सरकार किती काळ टिकणार, याविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली .
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन. हि तीन चाकांची गाडी किती दूरपर्यंत जाते, हे बघूया. शरद पवार या अनैसर्गिक आघाडीला एकत्र बांधून ठेवत आहेत. कॉंग्रेसला दहा टक्के अधिकारवाणीदेखील ह्या सरकारमध्ये नाही. दिल्लीवरून ते फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत," असे पूनम महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
ह्या तिन्ही पक्षांचे एकत्रीकरण हि अनैसर्गिक आघाडी आहे, त्यांच्यात समान विचार आढळणे कठीण गोष्ट आहे, या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. शिवसेना कदाचित नैसर्गिक विचारधारेकडे परत येईल असा आशावादही पूनम महाजन यांनी व्यक्त केला आहे. "आम्ही हिंदुत्ववादी होतो , आता ते 'सेक्युलर' झाले, कदाचित त्यांच्या नैसर्गिक विचारधरेकडे ते परत येतील," असंही पूनम महाजन म्हणाल्या.