नथुराम गोडसे प्रश्नावरून कॉंग्रेस चेकमेट

    दिनांक  29-Nov-2019 14:48:22
| 

'शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होताना गांधीजी विसरलात का ?'

नवी दिल्ली : नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्याप्रकरणी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी आज सभागृहात माफी मागितली. कॉंग्रेसने हा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. मात्र नथुराम गोडसेला स्वतःच्या अधिकृत मुखपत्रातून देशभक्त म्हणणाऱ्या शिवसेनेची सोबत चालते का, असा प्रतिप्रश्न उपस्थित करण्यात आला. भाजप खासदार डॉ. निशांत दुबे यांनी २० जानेवारी २०१३ रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचा दाखला दिला.


कॉंग्रसने माफी मागितली पाहिजे अशी मागणी डॉ. निशांत दुबे यांनी केली आहे. सत्तेसाठी महात्मा गांधींना सोडून देता का, असा प्रश्न कॉंग्रेससमोर उपस्थित करण्यात आला. कॉंग्रेसपक्षाला या प्रश्नावर निर्वाळा करणे जमले नाही. कॉंग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घालणे पसंद केले. लोकसभेची कार्यवाही दुपारी अडीज वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.