युकेमध्ये हिंदू उमेदरवारांना डावलण्याचा प्रकार

    दिनांक  29-Nov-2019 11:27:09
|लंडन : युकेतील हिंदूंच्या एका मोठ्या गटाने तिथल्या लेबर पार्टीवर 'वर्णद्वेषी' असल्याचा आरोप केला आहे. युकेच्या 'हिंदू काउन्सिल'ने पक्ष हिंदू मुस्लिम संबंधांचे ध्रुवीकरण करत असल्याचे म्हटले आहे. याबाबत मुख्य रब्बी एफ्राइम मिरविस यांनी पक्षाच्या या भूमिकेविरोधात पुढाकार घेतला. चीफ रब्बी एफ्राइम मिरविस यांना युके काऊन्सिलने यांनी पत्र लिहत हे मुद्दे मांडले आहेत.

 

'युके हिंदू काउन्सिल'च्या संस्थापकीय सदस्य अनिल भानोत यांनी चीफ रब्बींना पत्र लिहून समर्थन दर्शवले. मात्र, लेबर पार्टी दिवसेंदिवस ज्यू आणि हिंदू विरोधी बनत असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. संसदेच्या कोणत्याही कामगार सदस्याने ज्यूविरोधीचा निषेध केला नाही, त्यानंतर अचानक हिंदू समाजाला पक्षाच्या उमेदवारी निवडीतून वगळण्यात आले आहे. पुरोगामी समाजवादी आवाज असणार्‍या आपल्या देशातील एका बड्या राजकीय पक्षाने जवळजवळ 'फॅसिस्ट' विचारधारा असण्याडे दुर्लक्ष केले ही दुर्दैवी आहे. आम्ही आमच्या समुदायात शांतता आणि समरसतेसाठी आणि मुख्य म्हणजे राजकीय धोरण पातळीवर आवश्यक न्यायासाठी प्रार्थना करतो. असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

 

जम्मू काश्मीरचे विशेष कलम रद्द केल्यानंतर या पत्रात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायांनाही त्यांनी वाचा फोडली आहे. काश्मीर खोऱ्यातील तब्बल ४ लाख नागरिकांवर धर्मांतर करण्याची वेळ आली. काहींवर अत्याचार झाले. तिथल्या हिंदू आणि शिख समुदायाला जम्मूमध्ये निर्वासितांच्या छावण्यांचा आसरा घ्यावा लागला. मुस्लीम बहुल असलेल्या या काश्मीरमध्ये जेव्हा विशेषाधिकार काढून सर्वांना समान कायदा आणि एक संविधान केले जाते त्यावेळेस मात्र, कलम हटवल्याचा निषेध लंडनमध्ये केला जातो. हा हिंदू आणि ज्यू विरोधी प्रपोगंडा लेबर पार्टी का वापरत आहे, असा सवाल या पत्रात केला आहे. लेबर पक्षात असा धर्मविरोधी पायंडा न पाडता. सर्वांना न्याय मिळेल, पक्षात समानता अबाधित राहील, त्यावर लवकरच तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल, असा अनंत भानोत यांनी विश्वास व्यक्त केला आहे.