मीनाक्षी अम्मन मंदिर हाय अलर्टवर

28 Nov 2019 15:00:30




तामिळनाडू : मदुराईमधील जगप्रसिद्ध मीनाक्षी अम्मान मंदिराच्या सुरक्षेत काल रात्रीपासून वाढ करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांना ईमेलद्वारे मंदिरात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मंदिराची सुरक्षा वाढविण्यात आली.


आज दिवसभर बॉम्बस्कॉड या भागात पाहणी करत असून मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची बारकाईने तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात येत आहे. बॉम्ब डिस्पोजल पथक मंदिर परिसरात व मंदिरात तैनात करण्यात आले आहे. धमकीचा मेल काल रात्री सुरक्षा यंत्रणांना मिळाला होता.

Powered By Sangraha 9.0