नागपूरमध्ये सापडल्या ब्रिटिशकालीन तोफा

    दिनांक  28-Nov-2019 16:23:10
|
नागपूर : नागपूरमधील कस्तुरीचंद पार्कवर पुन्हा एकदा ब्रिटिशकालीन तोफा मिळाल्या आहेत. या पार्कच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरु आहे. मैदानाच्या मध्यभागी असणाऱ्या चबुतऱ्याच्या भोवती रस्ता बांधण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी देखील खोदकाम करताना याठिकाणी चार तोफा सापडल्या होत्या.


सध्या या मैदानावर महापालिकेद्वारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाली बनविण्याचे कार्य सुरू आहे. नालीचा मार्ग खोदत असताना बुधवारी रात्री अवघ्या दोन ते तीन फुटांवर साडेनऊ फूट लांब आकाराच्या दोन तोफ सापडल्या. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्य पुरातत्व विभागाला कळविले. गुरुवारी सकाळी राज्य पुरातत्व विभागाची चमू आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोफांची पाहणी केली. तोफांवर नमूद असलेल्या इंग्रजीतील
आरअक्षर आणि इंग्लडच्या राणीच्या मुकुटाच्या आकाराच्या चित्रावरून त्या रॉयल गन फॅक्टरीत तयार झालेल्या असाव्यात असा, अंदाज व्यक्त करण्यात आला होता.