ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आता 'धर्मनिरपेक्ष' ?
28-Nov-2019
Total Views |
महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात सुरवातीलाच धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख
मुंबई : जहाल आणि ज्वलंत हिंदुत्वासाठी प्रसिध्द असलेल्या शिवसेनेने आपल्या नव्या सरकाचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी हा किमान समान कार्यक्रम आखला आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच 'धर्मनिरपेक्ष' ह्या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. 'धर्मनिरपेक्ष' या शब्दाची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा खिल्ली उडवली होती. शिवसेनेच्या सभांतून दादा कोंडके यांनीही धर्मनिरपेक्ष शब्दाची खिल्ली उडवली जात असे. हिंदुत्ववादी असलेली शिवसेना 'सेक्युलर' झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.