'या' कारणासाठी संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ

28 Nov 2019 16:20:25


 

नवी दिल्ली : संजय राऊत यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. राऊत यांच्या सुरक्षेसाठी आता ११ जवान तैनत असणार आहेत. संजय राऊत यांनी कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारचे अभिनंदन करत असतानाच पाकिस्तानविरोधी वक्तव्य केले होते. यानंतर राऊत यांच्या निषेधार्थ पोस्टर पाकिस्तानात लावण्यात आले होते.

 

कलम ३७० हटवण्याबद्दल अमित शाह यांचे अभिनंदन करताना राऊत म्हणाले होते, "कलम ३७० हा देशासाठी डाग होता. ७० वर्षांपासून हा डाग देश घेऊन चालत होता. मात्र, मोदी सरकारने हा डाग पुसून टाकला." राऊत यांच्या वक्तव्याचे पडसाद पाकिस्तान उमटले. आता त्यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. यात दोन कमांडो, पोलीस आणि ११ जवान आदींसह वैयक्तिक सुरक्षा रक्षक असे कवच राऊतांभोवती असणार आहे.
Powered By Sangraha 9.0