निवृत्तीवर धोनी म्हणतो जानेवारीपर्यंत 'नो कमेंट्स'

    दिनांक  28-Nov-2019 15:48:22
|


 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेनंतर क्रिकेटपासून लांब आहे. तो विश्वकपनंतर निवृत्ती घेणार अशा चर्चां रंगल्या होत्या. मात्र, त्याने निवृत्ती घेणार की पुनरागमन करणार याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आता त्याने याविषयी एका कार्यक्रमात जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका, असे सांगितले आहे.

 

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धोनी शेवटचा खेळला होता. त्यानंतर धोनीने संघाबाहेर राहणे पसंत केले. भारताचा वेस्ट इंडिज दौरा, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमधून धोनीने माघार घेतली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्येही धोनी खेळणार नाही.