इंदिरा गांधी-बाळासाहेबांच्या छायाचित्राद्वारे शिवसेनेची पोस्टरबाजी

    दिनांक  28-Nov-2019 14:18:47
|


 


मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथविधी घेण्यापूर्वी मोठे शक्तीप्रदर्शन पक्षातर्फे केले जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही फलकबाजीतून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यातील बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीदरम्यानचे छायाचित्र या फलकांवर दिसत आहेत.

 

आमदार सदा सरवणकर आणि नगरसेवक समाधान सदा सरवणकर यांनी या पोस्टरद्वारे नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तरीही या पोस्टरची इंदिरा-बाळासाहेब यांच्या फोटोमुळे वेगळी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही एक फोटो या बॅनरवर लावला आहे. या तिन्ही पक्षांच्या एकतेचा संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.