पक्षाचा आदेश धुडकावत कॉंग्रेस आमदारांनी लावली आदित्यनाथांच्या अधिवेशनाला हजेरी

    दिनांक  28-Nov-2019 15:35:04
|


रायबरेलीच्या आमदार आदिती सिंग यांना अपात्र ठरवण्यासाठी कॉंग्रेसने लिहिले पत्रवृत्तसंस्था (लखनौ): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बोलवलेल्या ३६ तासांच्या विशेष अधिवेशनास उपस्थिती लावल्याबद्दल रायबरेलीच्या आमदार आदिती सिंग यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. याविषयीचे अधिकृत पत्र उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृद्य नारायण दीक्षित यांना पाठविण्यात आले आहे.


२ ऑक्टोबर रोजी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने विशेष अधिवेशन बोलवले होते. कॉंग्रेस आमदारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहू नये असा 'व्हीप' कॉंग्रेसपक्षाने जारी केला होता. आदिती सिंग यांनी पक्षाने टाकलेल्या बहिश्काराकडे दुर्लक्ष केल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी आदिती सिंग यांनी ३७० कलमासंदर्भाने भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले होते. कॉंग्रेसच्या सभागृह नेत्या आराधना मिश्रा यांनी ह्या कृत्याबाबत आदिती सिंग यांना विचारणा केली. मात्र आदिती सिंग यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नसल्याचे मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले आहे.

आदिती सिंग यांनी मात्र स्वतःच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाबद्दल बोलण्याचा मी प्रयत्न केला असे आदिती सिंग म्हणतात.
नुकतीच उत्तरप्रदेश कॉंग्रेसमधील दहा नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई पक्षाकडून करण्यात आली होती.