काँग्रेस नेत्यांना पत्रकार परिषदेची वेळ ठाऊकच नाही !

    दिनांक  28-Nov-2019 17:04:39
|


 


मुंबई : महाविकास आघाडीचा किमान-समान कार्यक्रम जाहीर करण्याबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली. बैठकीला शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, नवाब मलिक हे तीन नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली, असे चित्र होते. कारण कॉँग्रेस नेत्यांना पत्रकार परिषदेची वेळ ही पाच वाजता आहे, असा समज झाला.  


काँग्रेस नेते कुठे आहेत, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यांनतर ते पोहोचतील, असे सांगण्यात आले मात्र, पत्रकार परिषद संपेपर्यंत काँग्रेस नेत्यांचा पत्रकार परिषदेत पत्ताच नव्हता. अखेर नेत्यांनी याबद्दलच्या खुलाश्यात सांगताना काँग्रेस नेत्यांना पत्रकार परिषद पाच वाजता आहे, असे वाटल्याने ते पोहोचू शकले नाहीत, असे सांगितले. अखेर काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात या बैठकीला उशीराने पाच वाजता दाखल झाले आणि किमान समान कार्यक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.