शपथविधी पूर्वीच अशोक चव्हाण अडचणीत

28 Nov 2019 12:29:04





मुंबई
: वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची सक्तवसुली संचलनालयाकडून पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. हा घोटाळा उघडकीस येताच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता. आज महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळणार तसेच काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष पद देण्यात येणार आहे. शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या या मंत्रिमंडळात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा शपथ घेतील. तसेच विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु तत्पूर्वीच आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढू शकतात.


दक्षिण मुंबईत कुलाब्यात युद्धात शाहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी कारगिल तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणाचे नाव समोर आले होते. आदर्श घोटाळा २०१०मध्ये समोर आला होता. आता मंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे कळते. ईडीनं आदर्श घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी फ्लॅटमध्ये मोजणीही केली. कुलाबामध्ये मोक्याच्या जागेवर उभारलेल्या ३१ मजली टॉवरमध्ये नोकरशहा
, राजकीय नेते आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत.या घोटाळ्यात या गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर फ्लॅटधारकांनाही आरोपी करण्यात आले.

Powered By Sangraha 9.0