आणि वरुण थोडक्यात बचावला...

27 Nov 2019 17:02:54



वरुण धवन सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'कुली नं.' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटातील एका स्टंटच चित्रीकरण पुण्यात सुरु असताना वरुण धवन थोडक्यात बचावला आहे.

वरुण एका गाडीत बसलेला असतो आणि ती गाडी डोंगराच्या कडेला अधांतरी अडकते असं ते दृश्य... चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी वरुणने त्याच्या स्टंट दिग्दर्शकसोबत या दृश्याची तालीम केली होती. मात्र नेमकं दृश्य चित्रित करताना वरुण त्या अधांतरी लटकलेल्या गाडीत अडकला. त्या गाडीचा दरवाजा लॉक झाल्यामुळे त्यातून बाहेर पडणं कठीण झालं होतं. बऱ्याच वेळ मेहनत केल्यानंतर स्टंट दिग्दर्शकाच्या मदतीनं वरुण यातून सुखरूप बाहेर पडला.




डेव्हिड धवनचा 'कुली नं. १' हा चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला गोविंदाचा चित्रपट 'कुली नं. १'चा रिमेक आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Powered By Sangraha 9.0