अजित दादांना हवंय उपमुख्यमंत्रीपद ?

27 Nov 2019 15:04:04



मुंबई : यशवंतराव चव्हाण सभागृहबाहेर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, अजितदादांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी उचलून धरली. अजित पवार मात्र यावर काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांची ही मागणी पूर्ण होणार का? अजित पवारांना कुठलं मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहीलं आहे.

नुकताच नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक सुरु होती. या बैठकीला अजित पवारांनाही हजेरी लावली होती.

Powered By Sangraha 9.0