जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार होणार

    दिनांक  27-Nov-2019 11:50:08
|
जम्मू : जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी पोलीसांना जम्मू काश्मीरच्या सर्व धार्मिक सुरक्षा स्थळांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासह त्यांनी पडझड झालेल्या सर्व प्रार्थना स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी लागणारा खर्च मंजूर करून त्यावर तातडीने कार्यवारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मिरात त्राल येथील एका धार्मिक स्थळावर हल्ला करत आग लावली होती.

 

त्यानंतर सुरक्षादलांनी दक्षिण काश्मीर भागातील बंदोबस्त कडेकोट करण्यात आला आहे. भावना भडकणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. सोमवारी रात्री उशीरा डीजीपी दिलबाग सिंह आणि सीआरपीएफ एडीजीपी अरुण कुमार शर्मा यांनी उपराज्यपाल यांची भेट घेतली. उपराज्यपाल अरुण कुमार यांना सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगितला.