फिलिप ह्यूज '६३ नॉटआउट फॉरएव्हर'

    दिनांक  27-Nov-2019 12:12:39
|
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूज याचा स्मृतीदिन.

 २५ नोव्हेंबर २०१४ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजला एक उसळी घेणारा चेंडू मानेवर लागला होता. 

दुखापतीमुळे मणका व मेंदूला तीव्र जखम होऊन दोन दिवसांनी २७ नोव्हेंबर रोजी ह्यूजचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. 

२५ नोव्हेंबर २०१४ मध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान ह्यूजला सीन एबॉट याचा बाऊन्सर मानेला लागला आणि तो मैदानातच पडला.क्रिकेटपटू सीन एबॉट


 

लहानपणापासूनच एका महान क्रिकेटपटूचे स्वप्न पाहणाऱ्या ह्यूजचा वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्याच खेळामुळे मृत्यू झाला. 

आजच्या दिवशी नाबाद ६३ धावा करत हा क्रिकेटपटू आयुष्याच्या खेळपट्टीवर बाद झाला पण जाता जाता संपूर्ण जग जिंकून गेला... 

त्याच्या स्मृतिदिनी नेटकाऱ्यांनी '६३ नॉट आउट' म्हणत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.