चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ

27 Nov 2019 19:14:16





नवी दिल्ली
: आयएनएक्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने माजी अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. बुधवारी म्हणजे २७ नोव्हेंबरला चिदंबरम यांच्या कोठडीची मुदत संपत होती, त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांना जामिन देण्याला विरोध केला. ईडीने म्हटले की, आजूनही आमची चौकशी सुरुच असून त्यांना जामिन द्यायला नको. न्यायालयाने चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले.

Powered By Sangraha 9.0