कंगनाचं निर्मिती क्षेत्रात पाऊल!

26 Nov 2019 17:20:07



आगामी चित्रपट 'थलायवी'च्या टीझरमुळे अभिनेत्री कंगना राणावत सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा 'जयललिता' यांच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटातील लूकमुळे कंगनाच कौतुक होत आहे.

लवकरच कंगना एका नवीन चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'अपराजित अयोध्या' असं या चित्रपटाचं नाव असून, कलाकार आणि दिग्दर्शक कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. कंगनाची बहीण रंगोली चंडेलने ट्विट करत याची माहिती दिली. कंगनाच्या 'मणिकर्णिका फिल्म्स' या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे.


या चित्रपटाची कथा राम जन्मभूमीच्या वादावर बेतलेली असून, कथा आणि संहिता लेखन केवी विजेंद्र प्रसाद करणार आहेत. ब्लॉकबस्टर 'बाहुबली'ची संहिता विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती.

Powered By Sangraha 9.0