आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू- रावसाहेब दानवे

26 Nov 2019 12:23:49


 

बहुमत चाचणी उद्या संध्याकाळी होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीविषयी रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली. दरम्यान आज भाजपच्या कोअर कमिटीची देखील बैठक आज आयोजित करण्यात आली आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही आदर करतो. न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचा जो आदेश दिला आहे त्याला अनुसरून आम्ही बहुमत सिध्द करून दाखवू. आज रात्री ९ वाजता गरवारे क्लबमध्ये भारतीय जनता पक्षातील नेत्यांना आम्ही एकत्र करून पुढील दिशा ठरवली जाईल. अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

दरम्यान थोड्याच वेळात महाआघाडीची बैठक देखील आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये काय चर्चा होते याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज आयोजित करण्यात आली असून बाळासाहेब थोरात यांच्या नावावर कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाच्या घडामोडींचा असेल असे दिसत आहे.

Powered By Sangraha 9.0