राजभवनात कडेकोट बंदोबस्त

26 Nov 2019 15:22:26




मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यानुसार, राजभवनावर आता कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राजभवनावर येत्य़ा काही वेळात मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. सोमवारपर्यंत राजभवनावर तितकेसे सुरक्षा बल उपस्थित नव्हते. मात्र, मंगळवारी दुपारपासूनच सुरक्षा बल वाढवण्यात आले आहे. यात सीआरपीएफचे जवान या जागेवर तैनात करण्यात आले आहेत.

Powered By Sangraha 9.0