पुण्यात शिवशाही दरीत कोसळली ; २ जणांचा मृत्यू

    दिनांक  25-Nov-2019 16:02:26पुणे : पुण्याहून सांगलीकडे जाणारी एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप अधिकृतपणे मृतांचा आणि जखमींचा आकडा समोर आलेला नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सांगलीकडे जाणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुण्याजवळील कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना अपघात घडला. घाटात बस ५० फुट खोल दरीत कोसळली, बसमध्ये ४० प्रवासी होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून २१ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.