आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल स्थानी झेप

25 Nov 2019 12:49:24


चीनमधल्या तायचुंग येथे सुरु असलेल्या १५ वर्षांखालच्या आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत १३ सुवर्णपदकांसह २८ पदकांची कमाई करत जगात भारताचे नाव उंचावले आहे. यामध्ये भारताने आत्तापर्यंत १३ सुवर्ण, १४ रौप्य आणि एका कांस्य पदकासह २८ पदके पटकावली आहेत.

काल अखेरच्या दिवशी भारतीय मल्लांनी देखील उत्तम कामगिरी करत ५ सुवर्णपदकांवर आपली नावे कोरली. या स्पर्धेच्या खुल्या प्रकारात भारताने पहिल्यांदाच २२५ गुणांची कामगिरी करून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतानंतर या स्पर्धेत अन्य देशांनी देखील चांगले प्रदर्शन केले असून त्यापैकी कझागिस्तानने दुसरे तर जपानने तीसरे स्थान पटकावले.

Powered By Sangraha 9.0