नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची ५३८० कोटींची मदत

25 Nov 2019 19:11:06



मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी यांनी केलेल्या सत्तास्थापनेनंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. तरीही, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून आपात्कालिन निधीतून ५३८० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0