भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, अजित पवार दिशाभूल करत आहेत : शरद पवार

24 Nov 2019 18:04:26



मुंबई : राज्यातील सत्तानाट्याला अनेक धक्कादायक वळण येत आहे. अजित पवारांनी मी राष्ट्रवादी सोबतच आहे, असे स्पष्ट केल्यानंतर शरद पवारांनी ट्विट केले आहे. अजित पवार हे दिशाभूल करत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याचा प्रश्न येतच नाही, असे पवारांनी म्हटले आहे. आमचे ज्या प्रमाणे ठरले आहे, त्यानुसार शिवसेनेच्या नेतृत्वातच सरकार बनेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे.



 

"स्पष्टता आल्यानंतर सरकार बनवण्याच्या दृष्टीने तिन्ही पक्षांकडून खबरदारी घेतली जाईल. या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाशी आम्ही सहमती केली आहे आणि त्यादष्टीने तिन्ही पक्षांसह महाआघाडीतले सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र राहणार.", असे पवारांनी शनिवारी स्पष्ट केले होते. अजित पवारांनी रविवारी ट्विट केल्यानंतर शरद पवारांनी आता या प्रकाराला उत्तर दिले आहे.



 

Powered By Sangraha 9.0