'करून दाखवलं' म्हणत अमृता फडणवीसांनी हाणला सेनेला टोला

23 Nov 2019 15:09:55



मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज सकाळी ८ वाजता राजभवनात हा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर 'अभिनंदन, तुम्ही करून दाखवलेत' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. 'करून दाखवलं' म्हणत त्यांनी सेनेला जोरदार टोलाही लगावला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. तर त्यांचं अभिनंदन करत 'हे सरकार महाराष्ट्राच्या विकास आणि कल्याणासाठी सातत्याने वचनबद्ध राहील आणि राज्यात प्रगतीचे नवीन मापदंड स्थापित करतील' असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.



 
Powered By Sangraha 9.0