या कलाकाराने दिला आजोबांची भूमिका करण्यास नकार !

22 Nov 2019 17:39:46



अभिनेत्री कंगना राणावत आगामी चित्रपट
'थलायवी'साठी प्रचंड मेहनत घेत आहे. हा चित्रपट तामिळ अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कंगनाचा हा दुसरा बायोपिक आहे. याआधी कंगना 'मणिकर्णिका' या बायोपिकमध्ये झळकली होती. 'थलायवी'साठी कंगना तामिळ भाषा आणि भरतनाट्यम शिकत आहे. 

'थलायवी'मध्ये एन. टी. रामा राव यांच्या भूमिकेसाठी एनटीआर यांचा नातू, अभिनेता ज्युनिअर एनटीआरला विचारणा करण्यात आली. मात्र ही ऑफर धुडकावून लावत त्याने या भूमिकेसाठी नकार दिला आहे. या नकाराचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ए. एल. विजय यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अभिनेता अरविंद स्वामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Powered By Sangraha 9.0