वनवासींच्या तारपा वाद्याचे सूर हरवले..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2019
Total Views |




खानिवडे : काळाच्या ओघात अनेक वाद्ये, किंवा संगीत कमीकमी होऊ लागली आहे. वनवासींच्या प्रसिद्ध 'तारपा' या वाद्याबाबत होताना दिसत आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकार कमी होऊ लागल्याने येणार्या काळात या वाद्याचे सूर हरपतात कि काय असे वाटू लागले आहे. आता 'तारपा' वादकांची संख्या घटू लागली असल्याने 'तारपा' वादकांची वानवा कमी भासू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात 'तारपा' नृत्याचे सूर हरवण्याची चिंता भासू लागली आहे. श्रमजीवी संघटना आता यासाठी पुढाकार घेणार आहे.

 

वनवासी समाज उत्सवप्रिय आहे. तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. निसर्गपूजक आदिवासी समाज होळी, बारसे, नवीन आलेले पीक, नवीन भाताची लागवड, प्रत्येक प्रसंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य करतो. दिवसभर काम करून थकलेला आदिवासी 'तारप्या'चा सूर ऐकल्यानंतर आणि त्याच्यात नृत्याचा नाद संचारल्यावर मग मध्यरात्रीपर्यंत 'तारपा' नृत्य चालू असते. हातात हात गोफ गुंडाळून गोल रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर सामूहिक नृत्य केले.

 

तारपा वाजवणारे या वाद्यात मोठ्या ताकदीने फुंकर मारून विविध प्रकारच्या नृत्यासाठी विविध सूर काढतात. 'तारपा' नृत्य रात्री खूप वेळपर्यंत चालत असल्याने 'तारपा' वादकाची दमछाक होण्याची दाट शक्यता असते. मात्र, हे कलाकार आव्हान पेलण्यात सराईत असतात. 'तारपा' नृत्य हे आदिवासींसाठी करमणुकीचे प्रमुख साधन असून 'तारपा' वादकांची जुनी पिढी आता वयोवद्ध झाली आहे. नव्या पिढीचे ताज्या दमाचे कलाकार तयार होताना दिसत नाहीत. त्यामुळे 'तारपा'चे दमदार स्वर आणि आदिवासींचे प्रसिद्ध डौलदार नत्य कला टिकवण्याच्या मार्गावर आहे.

 

आदिवासींची बरीच नृत्य आहेत पण तारपा जास्त प्रसिद्ध आहे.परंतू त्याचा वारसा टिकवणे आवश्यक आहे. आदिवासी संस्कृतीचा वारसा टिकवणे गरजेचे आहे.नवीन तारपा वादक तयार होणे गरजेचे आहे.

- वसंत भसरा, वनवासी अभ्यासक

@@AUTHORINFO_V1@@