मोबाईल इंटरनेट महागणार !

22 Nov 2019 11:54:01



मुंबई : मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत असणाऱ्या मोबाईल कंपन्यांनी आपले सेवा दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून हे नवीन इंटरनेट दर लागू होतील. यामध्ये एअरटेल, जिओ, व्होडाफोन, आयडिया व बीएसएनएल या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान या कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले नसले तरी येत्या एक दोन दिवसात याबाबत अधिकृतरीत्या घोषणा होण्याची शक्यता आहे. 


ग्राहकांना सर्वात कमी दरात इंटरनेट सुविधा देण्याच्या स्पर्धेत मोबाईल कंपन्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण देशभरात एअरटेल
, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांची सेवा वापरणारे ग्राहक मोठया संख्येने आहेत. त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणार्‍या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे. १ डिसेंबरपासून सेवाशुल्कात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे. स्वस्त व परवडणाऱ्या दारात इंटरनेट उपलब्ध होत असल्याने शहरी भागासोबतच ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे पसरले आहे. छोट्या इंटरनेट पॅकवरील शुल्कात कमी वाढ होणार असून मोठ्या प्लॅनवरील शुल्कात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. बहुतांश कंपन्यांनी शेवाशुल्कातही वाढीत एकसामानात ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पोस्टपेड वापरकर्त्यांपेक्षा प्री-पेड वापरकर्त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Powered By Sangraha 9.0