डॉ. फिरोझ खान यांच्या नियुक्तीला विरोध चुकीचा : संघाचे मत

    दिनांक  22-Nov-2019 22:10:47
|लखनौ : बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विद्या आणि धर्म विज्ञान संस्थेच्या साहित्य विभागात डॉ. फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीला अनेकांकडून विरोध करण्यात आला. डॉ. फिरोज खान यांच्या नियुक्तीला विरोध करणे चुकीचे असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे.

 

या विरोधाशी संघ सहमत नाही. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या संघाच्या बैठकीत हे बहुमताने निश्चित करण्यात आले," अशी माहिती काशी विभाग संघचालक डॉ. जयप्रकाश लाल यांनी शुक्रवारी बैठकीत दिली. "समर्पित वृत्तीने आणि श्रद्धेने संस्कृत साहित्य शिकविणार्‍या, वैध निवड प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या एका व्यक्तीला सांप्रदायिक आधारावर होणारा विरोध हा अयोग्य आणि सामाजिक सौहार्द बिघडविणारा आहे. संघ या वृत्तीचा, प्रवृत्तीचा विरोध करतो," असेही त्यांनी म्हटले आहे.