बांग्लादेश १०६वर सर्वबाद ; इशांतचा 'पंच'

    दिनांक  22-Nov-2019 17:30:04
|


 


कोलकाता : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये पहिला दिवस-रात्र कसोटी सामना सुरू झाला आहे. कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जात आहे. उभा सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशला टिकाव धरता आला नाही. पहिल्या सत्रात शंभरीही पार करु शकणारा बांग्लादेश दुसऱ्या सत्रात केवळ १०६ धावांवर आटोपला. यामध्ये इशांत शर्माने ५ विकेट घेत फलंदाजांची पळताभुई थोडी केली.

 

नाणेफेक जिंकत बांग्लादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच बांग्लादेशचे फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर निष्प्रभ ठरले. अवघ्या १५ धावांवरच इशांत शर्माने इमरुल कायसला माघारी धाडले. त्यानंतर बांगलादेशच्या धावाला गळतीच लागली. अवघ्या ३८ धावांवरच बांगलादेशचा निम्मा संघ बाद झाला होता. उमेश यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी सारख्या तगड्या भारतीय फलंदाजांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. त्यामुळे गुलाबी चेंडूचा फायदा हा गोलंदाजांनी पुरेपूर घेतला.