सुटेल का 'विकी'चं कोडं ?

    दिनांक  21-Nov-2019 17:49:16
|'विकी वेलिंगकर' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. या उत्कंठावर्धक ट्रेलरमध्ये अभिनेत्री सोनाली म्हणजे चित्रपटातली 'विकी वेलिंगकर' ही सतत पळत, तिला पडणाऱ्या कोड्यांची उत्तरं शोधताना दिसतेय. चित्रपटाची कथा एका कार्टूनिस्ट च्या आयुष्याभोवती फिरते. आपला कोणीतरी पाठलाग करतंय असा तिला सतत होणार भास... हा नेमका भास की सत्य, याचं उत्तर ती शोधतेय. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का, हे पाहणं प्रेकक्षकांसाठी नक्कीचं उत्कंठावर्धक ठरणार आहे.


चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा एक जबरदस्त सस्पेन्स चित्रपट असल्याचं लक्षात येतं.
'विकी वेलिंगकर'मध्ये सोनाली कुलकर्णीसह स्पृहा जोशी, संग्राम समेळ, वनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.