विंडीजला हरवत भारतीय महिला संघाचा व्हाईट वॉश

21 Nov 2019 16:14:42




नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नावावर आणखी एक नवा विक्रम नावावर केला आहे. मह्राहस्त्राच्या स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने आपल्या अखेरच्या टी-२० सामन्यात विंडीजच्या महिला संघावर मात केली आहे. ६१ धावांनी विजय मिळवत भारतीय महिलांनी ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं. भारताकडून पहिल्यांदा फलंदाजी करताना वेदा कृष्णमुर्तीने ५७ तर मुंबईर जेमायमा रॉड्रीग्जने ५० धावा केल्या.

 

पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या भारतीय महिला संघाची सुरुवात अडखळत झाली. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना झटपट माघारी परतल्या. मात्र, त्यानंतर जेमायमा रॉड्रीग्ज आणि वेदा कृष्णमुर्ती यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिलांनी १३४ धावांपर्यंत मजल मारली.

 

या धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव पूरता कोलमडला. एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजाचा सामना करता आलं नाही. क्योश्ना नाईट आणि शेमिन कँपबेल यांचा अपवाद वगळता एकही विंडीजची फलंदाज दोन अंकी धावसंख्या गाठू शकली नाही. विंडीजचा पूर्ण संघ अवघ्या ७३ धावांत आटोपला. भारताकडून गोलंदाजीत कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने २ तर राधा यादव, पूनम यादव, पुजा वस्त्राकर आणि हरलीन देओल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. वेस्ट इंडिजचा महिला संघ हा जागतिक क्रिकेटमध्ये तुल्यवान मनाला जातो. त्यांना त्यांच्याच मैदानात व्हाईट वॉश देऊन भारतीय महिला संघाने आपला फॉर्म राखला आहे.

Powered By Sangraha 9.0